श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था, लातूर संचलित
श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय

श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय

सुसंस्कृत मन, सक्षम जीवन घडवणारे मंदिर

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था, लातूर संचलित
प्रवेश प्रक्रिया २०२६-२७
भाषा निवडा
यू-डायस कोड: २७२८०८००१०१
मदत कक्ष: ०२३८२-२४३४५६
श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाविषयी

१९४६ पासून स्त्री शिक्षणाची अखंड ज्ञानज्योत

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था, लातूर संचलित, श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय ही बालवाडी ते इयत्ता १० वी पर्यंत दर्जेदार शिक्षण देणारी शासनमान्य अनुदानित शाळा आहे. मराठवाड्यातील पहिली कन्या शाळा म्हणून या संस्थेला ऐतिहासिक स्थान लाभले आहे.

शाळेविषयी

आमची जीवनगाथा

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था, लातूर संचलित श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय हे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच म्हणजेच १९४६ मध्ये स्थापन झाले. मुलींना अर्थपूर्ण शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना सुसंस्कृत, जबाबदार, आत्मविश्वासू व सक्षम नागरिक म्हणून घडवणे या उदात्त ध्येयाने या विद्यालयाची स्थापना झाली. मराठवाड्यातील ही पहिली कन्या शाळा ठरली.

आज हे शासनमान्य अनुदानित विद्यालय बालवाडी ते इयत्ता १० वी पर्यंत मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देत आहे.

१९४६
लातूर येथे स्थापना

मराठवाड्यातील पहिली कन्या शाळा

चार भिंतींच्या पलीकडचे शिक्षण

प्रत्येक विद्यार्थिनीने तिची सुप्त क्षमता ओळखावी, कलागुणांना वाव द्यावा आणि समाजात सकारात्मक योगदान द्यावे यासाठी आम्ही निरंतर प्रोत्साहन देतो. शैक्षणिक ज्ञानासोबतच आत्मविश्वास, जबाबदारी आणि सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक मूल्यांची भक्कम जोड आम्ही देतो.

आमचा इतिहास आणि नेतृत्व

८० वर्षांचा देदीप्यमान इतिहास, विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापिकांची परंपरा, समर्पित शिक्षक वृंद आणि विविध प्रशासकीय समित्यांची माहिती मिळवा.