श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था, लातूर संचलित
श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय

श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय

सुसंस्कृत मन, सक्षम जीवन घडवणारे मंदिर

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था, लातूर संचलित
प्रवेश प्रक्रिया २०२६-२७
भाषा निवडा
यू-डायस कोड: २७२८०८००१०१
मदत कक्ष: ०२३८२-२४३४५६
ऐतिहासिक वारसा

स्त्री शिक्षणाची ऐतिहासिक क्रांती

पारतंत्र्यात आणि निजाम राजवटीत मराठवाड्यात मुलींसाठी स्थापन झालेली लातूरची पहिली कन्या शाळा.

आमची यशोगाथा

स्वातंत्र्यपूर्व संघर्षापासून आधुनिक यशापर्यंत

“पुरुष शिकला तर तो एकटाच शहाणा होतो, पण स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणे होते.”

महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनदृष्टीने प्रेरित

या दृढ विश्वासाने प्रेरित होऊन, महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून, १९४६ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात आणि निजाम राजवटीत श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाची स्थापना झाली. शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठवाड्यात लातूरमध्ये मुलींची शाळा सुरू होणे ही स्त्री शिक्षणातील ऐतिहासिक घटना ठरली.

“ज्याच्या हाती पाळण्याची दोरी तो जगाते उद्धारी” या उक्तीप्रमाणे, थोर समाजसेवक व दानशूर कै. पूरणमलजी लाहोटी यांनी आपल्या भावजयीच्या स्मरणार्थ १९४६ मध्ये ही शाळा सुरू केली. श्रद्धेय स्वामी रामानंद तीर्थ, कै. बाबासाहेब परांजपे आणि समाजसुधारक कै. माई दिवाण यांच्या आशीर्वाद आणि प्रेरणेने या कार्यास गती मिळाली.

शाळेच्या स्थापनेचा व बांधकामाचा संपूर्ण खर्च लाहोटी कुटुंबीयांनी आपल्या वैयक्तिक निधीतून केला. लातूरचे शिक्षणप्रेमी कंत्राटदार कै. दीनानाथ वासुदेव सावे यांनी सामाजिक बांधिलकीतून शाळेचे बांधकाम पूर्ण केले. १९४६ ते १९६० या प्रदीर्घ काळात विद्यार्थिनींना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात आले. मुलींसाठी खास पुण्याहून शिक्षिका आणल्या गेल्या आणि त्यांना सुरक्षितपणे शाळेत आणण्यासाठी पडद्याच्या टांग्याची सोय करण्यात आली होती.

१९५४ मध्ये शेठ पूरणमलजी यांच्या निधनानंतर कै. नारायणलालजी लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली शाळेची प्रगती सुरू राहिली. १९५५ मध्ये मॅट्रिक परीक्षेची पहिली तुकडी उत्तीर्ण झाली (१५ पैकी १० विद्यार्थिनी उत्तीर्ण). १९५८ मध्ये प्राथमिक व माध्यमिक विभाग स्वतंत्र झाले. १९६० मध्ये ही शाळा अधिक विकासासाठी 'श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था' या मातब्बर संस्थेकडे सोपवण्यात आली.

मुख्याध्यापिका श्रीमती मालतीबाई म्हैसकर यांच्या कार्यकाळात ५ वी ते १० वी साठी प्रत्येकी तीन तुकड्यांना मान्यता मिळाली. १९९६ मध्ये शाळेचा 'सुवर्ण महोत्सव' ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे, प्रा. हेमलता पाटील व न्यायाधीश संघमित्रा मांजरेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. २००६ मध्ये शाळेने 'हीरक महोत्सव' साजरा केला, ज्याचे समारोप तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांच्या हस्ते झाले.

आपली यशस्वी ७८ वर्षे पूर्ण करून ८० व्या वर्षात (ऑक्टोजेनेरियन) पदार्पण करताना, श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय ज्ञान, चारित्र्य, आत्मविश्वास आणि महिला सबलीकरणाचा हा पवित्र वारसा अखंड पुढे नेत आहे.

पहिली नियामक समिती

शाळेची पहिली नियामक समिती

१९४६ च्या ऐतिहासिक स्थापनेवेळी विद्यालयाचे मार्गदर्शन व दायित्व सांभाळणारे आद्य विश्वस्त.

अध्यक्षकै. माननीय श्री. नारायणलालजी लाहोटी
मंत्रीकै. श्री. दीनानाथ वासुदेव सावे
उपमंत्रीकै. श्री. द्वारकादासजी नवंदर
सदस्यकै. श्री. कल्याणजीभाई शहा
सदस्यश्री. बालकिशनजी बलदवा
नेतृत्वाची गौरवशाली परंपरा

मुख्याध्यापिकांची देदीप्यमान परंपरा

शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत १३ समर्पित मुख्याध्यापिकांनी आपल्या कुशल नेतृत्वाने विद्यालयाला वैभवाच्या शिखरावर पोहोचवले.

01
मार्च १९५२ – मे १९६२

श्रीमती विद्यावती पटवर्धन

मुख्याध्यापिका • क्रम #01
02
जून १९६२ – जून १९६४

श्रीमती नलिनी गायकवाड

मुख्याध्यापिका • क्रम #02
03
जुलै १९६४ – जून १९७५

श्रीमती मालती म्हैसकर

मुख्याध्यापिका • क्रम #03
04
जुलै १९७५ – ऑक्टोबर १९७५; सप्टें १९७९ – सप्टें १९८४

श्रीमती शिरोमणी पुरुषोत्तम

मुख्याध्यापिका • क्रम #04
05
नोव्हें १९७५ – सप्टें १९७९; ऑक्टो १९८४ – ऑगस्ट १९९२

श्रीमती रत्नप्रभा बेंबळकर

मुख्याध्यापिका • क्रम #05
06
सप्टेंबर १९९२ – नोव्हेंबर २००१

श्रीमती वरदलक्ष्मी रेणापूरकर

मुख्याध्यापिका • क्रम #06
07
डिसेंबर २००१ – ऑगस्ट २००२

श्रीमती सविता पिंपळे

मुख्याध्यापिका • क्रम #07
08
सप्टेंबर २००२ – एप्रिल २००८

श्रीमती रेवती भोगले

मुख्याध्यापिका • क्रम #08
09
मे २००८ – जुलै २०१३

श्रीमती सुमन डोळे

मुख्याध्यापिका • क्रम #09
10
ऑगस्ट २०१३ – सप्टेंबर २०२०

श्रीमती उषा शिंदे

मुख्याध्यापिका • क्रम #10
11
ऑक्टोबर २०२० – नोव्हेंबर २०२३

श्रीमती सुनीता बोरगावकर

मुख्याध्यापिका • क्रम #11
12
डिसेंबर २०२३ – जानेवारी २०२६

श्रीमती संगीता कासार

मुख्याध्यापिका • क्रम #12
13
फेब्रुवारी २०२६ – सध्या कार्यरत

श्रीमती देशमुख अचला

वर्तमान कार्यरत मुख्याध्यापिका